esakal | कॉफीची हुक्की भागविणारे ‘ऑल दॅट्स कॉफी’ ICoffee
sakal

बोलून बातमी शोधा

कॉफीची हुक्की भागविणारे ‘ऑल दॅट्स कॉफी’

कॉफीची हुक्की भागविणारे ‘ऑल दॅट्स कॉफी’

sakal_logo
By
मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात चहाप्रेमींसाठी अनेक दुकाने आणि टपऱ्या गल्लोगल्ली आहेत. चहाची तलफ भागविणे सहज सोपे असले तरी ज्यांना कडक कॉफी पिण्याची हुक्की येते त्यांचे काय? नेमका हाच धागा पकडून कुशल, क्रितिका आणि अनुप या तिघांनी कॉफी चाहत्यांसाठी ‘ऑल दॅट्स कॉफी’ नावाने ‘कॉफी ऑउटलेट’ची साखळी उभारली आहे. या माध्यमातून लोकांना कडक कॉफी तर मिळतेच पण कित्येकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात चहांच्या विविध ऑउटलेटला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हजारो तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. मात्र, आजही कॉफीसाठी ‘सीसीडी’ आणि शहरातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये जावे लागते. अनेकदा त्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे एखाद्या परिसरात गरमागरम कॉफी प्यायची इच्छा झाल्यास लगेच नजीकच्या ठिकाणी ती उपलब्ध होईल या अनुषंगाने हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेला अनुप वडोदकर, आर्किटेक्ट क्रितिका भाटिया आणि अभियंता असलेला कुशल राठी यांनी एकत्र येत, ‘ऑल दॅट्स कॉफी’ ही संकल्पना मांडली. त्यातून शहरातील धरमपेठ, प्रतापनगर, सदर आणि वर्धमाननगर येथे ‘ऑल दॅट्स कॉफी’चे ‘टेक अवे कॉफी’ ऑउटलेट्स देण्यास सुरुवात केली. अगदी दोनशे चौरसफुटाच्या जागेवर ‘ऑल दॅट्स कॉफी’ सुरू करण्याचे काम त्यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्या कॉफीसाठी या चारही ऑउटलेटवर मोठी गर्दी असते. ‘टेस्ट मे बेस्ट’ असे कॉफीचे ५० ते ६० प्रकार या आउटलेटवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामध्येही फ्रॉपेज, अमेरिकॅनो ब्लॅक कॉफीची भुरळ लोकांना पडली आहे. गेल्या वर्षभरात या ऑउटलेटला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या ऑउटलेटचा विस्तार पुण्यासह भिलाई, भोपाळ आणि अमरावतीमध्येही करीत आहेत.

शहरात कॉफीचे चाहते अधिक

शहरात कुणाचीही भेट घेतल्यावर त्याला प्रथम कॉफीची ऑफर देण्यात येते. त्यामुळे यापूर्वी केवळ एक ‘सीसीडी’ असलेल्या शहरात आता कॉफीची अनेक दुकाने सुरू झाली आहेत. त्यामध्ये ‘ऑल दॅट्स कॉफी’ अतिशय प्रसिद्ध झालेली आहे.

"शिक्षण घेतल्यावर स्वतःचे काही सुरू करीत, त्यातून इतरांनाही फायदा होईल असे काहीतरी करण्याचा मानस होता. त्यामुळे कुशल, अनुप आणि मी असे आम्ही तिघांनी एकत्र येत हा हा उपक्रम सुरू केला."

- क्रितिका भाटीया

loading image
go to top