अमरावती: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका टर्पेंटाइन पॅकिंग उद्योगात आज अचानक आग लागून त्यात एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. सहा) घडली. .Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार .मोनाली सुनील कोडापे (वय २९) असे मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगाराचे नाव असून ती वर्धा जिल्ह्यातील हरदोली येथील रहिवासी असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. अमरावतीच्या एमआयडीसीमधील डब्ल्यू २३, इनव्हेंटो फॅक्टरीला लागूनच असलेल्या शेडमध्ये टर्पेंटाइन पॅकिंगचे काम चालते. नागपूरवरून २०० लीटर क्षमतेच्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात टर्पेंटाइन येथे आणले जाते..या फॅक्टरीमध्ये मोठ्या ड्रममधील टर्पेंटाइन २५० मिली, ५०० मिली या प्रमाणात बॉटलमध्ये रिपॅकिंग केले जाते. सुमारे ३०० ते ४०० वर्गफुटांच्या जागेत हे काम सुरू होते. येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दरम्यान अचानक आग लागली. त्यावेळी तेथे सात महिला काम करीत होत्या. त्यातील सहा जणींना बाहेर पडता आले; .परंतु, मोनाली कोडापे हिला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही व तिचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. पोलिस, तसेच एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील उद्योजकांनी सुद्धा याठिकाणी गर्दी केली होती..Pune News:...अखेर तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप; आंबेगाव तालुक्यातील शेतात आढळली बछडे, बिबट्या मादीचा जीव भेटीसाठी कासावीस!.पंधरा दिवसांपूर्वीच आले होते कोडापे दाम्पत्यमोनाली व पती सुनील लक्ष्मण कोडापे हे दोघे पंधरा दिवसांपूर्वीच या इंडस्ट्रीजमध्ये वर्धा जिल्ह्यातील हरदोलीवरून मजुरीकरिता आले होते. याच फॅक्टरी परिसरात उभारलेल्या एका झोपडीत ते दोघेही राहत होते. घटनेच्या वेळी मृत मोनालीचा पती सुनील हा बाजूलाच असलेल्या दुसऱ्या इमारतीत, तर पत्नी मृत मोनाली टर्पेंटाइन पॅकिंगच्या ठिकाणी काम करीत होती. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.