Amravati News: व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून संपवल जीवन, धक्कादायक कारण आलं समोर

अमरावती शहरातील राजापेठ भागात असलेल्या मिलन मिठाईचे संचालक अशोक होशियारसिंग शर्मा (वय ६२, रा. अमरावती) यांनी वापरातील जुन्या बंदुकीने स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
Amravati News: व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून संपवल जीवन, धक्कादायक कारण आलं समोर

Amravati News: अमरावती शहरातील राजापेठ भागात असलेल्या मिलन मिठाईचे संचालक अशोक होशियारसिंग शर्मा (वय ६२, रा. अमरावती) यांनी वापरातील जुन्या बंदुकीने स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आज रविवारी (ता. १९) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. तेव्हापासून ते आजारपणामुळे त्रस्त होते. रविवारी सायंकाळी दिवाळीनिमित्त सर्वमंडळी दर्शनासाठी मंदिरात निघाली होती. परंतु अशोक शर्मा हे घरीच थांबले होते. घरी कुणी नसताना त्यांनी दार आतून बंद केले व घरात असलेल्या जुन्या वापरातील बंदुकीने (रायफल) स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

मुलगा आणि कुटुंबीय तासाभराने घरी परत आल्यावर वडील दार उघडत नसल्याचे बघून मुलाने आवाज देण्याचा प्रयत्न केला. अखेर दार तोडून मुलगा घरात पोहोचला, त्यावेळी वडील बेडरूम मध्ये मृतावस्थेत पडलेले आढळले. अशोक शर्मा यांनी आजारपणाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली. असे राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बडनेरा मार्गावरील शर्मा यांच्या निवासस्थानी भेट दिली. (Latest Marathi News)

Amravati News: व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून संपवल जीवन, धक्कादायक कारण आलं समोर
World Cup 2023 : 'आम्ही तुटून गेलो होतो पण...' वर्ल्ड कप हरल्यावर मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये, जडेजाची भावुक पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com