मिहानमध्ये अंजनी लॉजिस्टिक्स उभारणार गृह, व्यावसायिक संकुल

प्रचंड प्रमाणात गुंतवणुक वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध
मिहान
मिहानsakal

नागपूर : कोरोना काळात मंदावलेल्या अंजनी लॉजिस्टिक्स या कंपनीने सर्वात जास्त दर देऊन मिहानमध्ये गृह आणि व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी चार एकर भूखंडाचे वाटप केले आहे. हा प्रकल्प नागपूर मेट्रोच्या ‘खापरी’ या स्थानकापासून जवळ आहे. यामुळे मिहानमधील नव्हे तर नागपूरकरांना नवीन मॉल, शॉप्सची सुविधांचा लाभ येथे होऊ शकणार आहे. मिहानमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणुक वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

मिहानमधील उच्चदर्जाच्या पायाभूत सुविधा व उद्योगपूरक वातावरणामुळे मागील वर्षभरात बऱ्याच कंपन्यांनी आपले प्रकल्प सुरु करण्यासाठी गुंतवणुक केली आहे. तसेच बऱ्याच जुन्या गुंतवणुकदारांनी त्यांचे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून कार्यालये तसेच उत्पादन सुरू केले आहे. यामुळे मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली आहे. मिहान हे आय.टी, एविएशन तसेच अॅग्री बिझनेस हब म्हणून उदयास येत आहे.

मिहान
UPSCचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल; 761 जणांची नियुक्ती

या वाढत्या रोजगारामुळे मिहानमध्ये निवासी गृहसंकुल तसेच दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी व्यावसायिक संकुलांची गरज मोठया प्रमाणावर वाढत आहे. विद्यमान स्थितीत महिंद्रा, मोराज व एआयटीपीएल या बांधकाम व्यावसायिकांनी आपले गृहसंकुल प्रकल्प उभारले आहेत. एचसीएल या कंपनीने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी गृहसंकुल उभारण्यासाठी मिहानमध्ये सुमारे २० एकर एकर जागा खरेदी केली आहे. यामुळे अंदाजे पाच ते सात हजार घरे नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकतील.

मिहानमध्ये येणारा उद्योगांचा ओघ व त्यामुळे अपेक्षित असलेली रोजगार निर्मिती पाहता निवासी तसेच व्यावसायिक गृहसंकुलांची मागणी वाढती राहणे अपेक्षित आहे. यामुळेच मिहानमध्ये सेक्टर २२ मधील सुमारे चार एकर जागेवर अद्ययावत गृह व व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी निविदा काढली होती असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी कळविले आहे. रोजगार, व्यवसाय, निवासी सुविधा तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तूंची उपलब्धता एकाच परिसरात उपलब्ध होत असल्याने मिहान हे सर्व सुविधायुक्त ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे असेही त्याचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com