
नागपूर : नशामुक्त समाज घडविण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी २६ जूनपर्यंत शहरात अंमली पदार्थविरोधी सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित शपथ समारंभात हजारोंच्या संख्येत नागरिक, मुले आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवून ‘एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ अशी शपथ घेतली.