election commission independent candidate symbol selection
sakal
नागपूर - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल १९४ चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत.
यामध्ये विविध चिन्हांचा समावेश आहे. यात सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फ्लॉवर, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेर, अननस, कलिंगड, अक्रोड, जेवणाची थाळी अशा चिन्हांचा समावेश आहे.