esakal | ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करा; एम्सच्या डॉक्टरांना नितीन गडकरींचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करा; एम्सच्या डॉक्टरांना नितीन गडकरींचे निर्देश

ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करा; एम्सच्या डॉक्टरांना नितीन गडकरींचे निर्देश

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून रुग्णांसाठी ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टरांना दिले.

कोरोनाचा शहरात वाढता प्रकोप लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्सच्या डॉक्टरांसोबत आढावा घेऊन परिस्थितीची माहिती करून घेतली. एम्सतर्फे कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही माहिती घेतली. या बैठकीला एम्सच्या संचालक डॉ. विभा गुप्ता, डॉ. श्रीगिरीवार उपस्थित होते.

हेही वाचा - दुर्दैवी! बेड न मिळाल्यामुळे अर्ध्या वाटेतच शिक्षकाचा मृत्यू; नागपुरात सुविधांचा अभाव

कोविडची शहरातील स्थिती पाहता निर्माण होणार्‍या समस्या व अडचणींवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ना. गडकरी यांनी डॉक्टरांना या बैठकीत सूचना केल्या. एम्समध्ये बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणे, ऑक्सीजन पुरवठा वाढविणे आणि एचआरसीटी व्यवस्था युध्दपातळीवर कार्यान्वित करण्याचे निर्देशही याप्रसंगी ना. गडकरी यांनी एम्सच्या डॉक्टरांना दिले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविडच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर, डॉ. आनंद पाठक उपस्थित होते.

हेही वाचा - अभिमानास्पद! नागपूर जिल्ह्यातील येनिकोणी गावाला केंद्र शासनाचा 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर

NCIमध्ये कोविड केअर सेंटर सुरु

- रुग्णालयांकडे आता स्वत:चा ऑक्सीजन प्लांट असावा

- १०० बेडची सेवा सुरू. २० आयसीयू, ३० व्हेंटीलेटर्सचे बेड उपलब्ध होणार

- भिलाईवरून होणार ४०० ऑक्सीजनचा पुरवठा

संपादन - अथर्व महांकाळ

loading image