काँग्रेसच्या नेत्याचा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब, वाद पोहोचला दिल्लीत

Congress
Congressesakal

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार (minister sunil kedar) यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप करून माजी आमदार आशीष देशमुख (former MLA Ashish Deshmukh) यांनी खळबळ उडवून दिली असून आता हा वाद दिल्लीत पोहोचला आहे. केदारांनी दिल्लीत जाऊन आपली बाजू सावरल्याने देशमुखही बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत.

Congress
विजया धोटे यांच्या घरावर हल्ला; भूखंड ताबा घेण्याचा प्रयत्न

दीडशे कोटी रुपयांचा अपहार केल्याने केदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्‍टी करण्याची मागणी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या लेटरबॉम्बने सारेच हादरले आहेत. काँग्रेसकडून घरचा आहेर मिळाल्याने केदारांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. त्यांनी तातडीने दिल्ली गाठून सारवासारव केल्याचे समजते. हे समजताच देशमुख यांनी दिल्लीची तयार केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांना या नेत्यांनी भेटीच वेळ दिली की नाही हे समजू शकले नाही. मात्र तातडीने ते दिल्लीला रवाना झाल्याने निश्चितच कोणीतही भेटणार असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात केदार-देशमुख यांच्यातील वाद जुनाच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू आहे. सुरुवातीला सावनेरमधून देशमुखांनी केदारांना एकदा पराभूत केले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत केदारांनी पराभवाचे उट्टे काढले. आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असताना सावनेरमध्ये त्यांची केदार यांच्याशी जोरदार लढत झाली होती. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या लढतीत आशिष देशमुखांचा निसटता पराभव झाला होता. देशमुख काटोलमध्ये गेल्याने हा वाद क्षमला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी कोटोलमध्ये झालेल्या एका बैठकीत केदारांनी बैठकीतून उठवून अपमान केल्याने देशमुख चांगलेच संतापले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. आता दिल्लीतील काँग्रेसचे शीर्षस्थ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केदारांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. देशमुख यांनी आपण दिल्ली जात असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com