.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड या हक्काच्या मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी अर्थमंत्री व याच मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिलेले स्व. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य यांच्या नावासाठी येथून काँग्रेसने आग्रह धरला आहे.