Nagpur News: बेपत्ता अथर्वचा मृतदेहच सापडला;गिट्‍टीखदान येथून झाला होता बेपत्ता, भरतवाडा रेल्वे पुलावर आढळला मृतदेह

Circumstances of Disappearance During Hanuman Jayanti Parade: नागपुरमध्ये गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेला १४ वर्षीय अथर्व नन्नोरेचा मृतदेह भरतवाडा रेल्वे पुलावर आढळला. पोलिसांनी त्वरित पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: गिट्टीखदान येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय अथर्व दिलीप नन्नोरे (रा. माहोपे पेट्रोलपंपजवळ गवळीपुरा) याचा मृतदेह कळमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलावर शनिवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून गिट्टीखदान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने कुश कटारिया, युग चांडक या चिमुकल्यांच्या अपहरणानंतर हत्येच्‍या घटनेची आठवण करून दिली आहे.

गिट्टीखदान हनुमान मंदिरात दरवर्षी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यात अथर्व याचे वडील दिलीप नन्नारे यांच्या चित्ररथाचा समावेश असतो. मात्र, यंदा त्यांनी चित्ररथ काढण्याऐवजी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यामुळे अथर्व मिरवणुकीत मित्रांसह सहभागी झाला होता. तिकडे स्टॉलवर त्याचे वडील महाप्रसादाचे वितरण करीत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com