मुंबईच्या युवकाने भंडाऱ्यातील युवतीवर नागपुरात केला बलात्कार

मुंबईच्या युवकाने भंडाऱ्यातील युवतीवर नागपुरात केला बलात्कार

नागपूर : फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर भंडाऱ्याच्या युवतीला मित्रानेच नागपुरातील हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. यानंतर लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने बलात्काराची तक्रार दिली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाधान रामचंद्र पवार (रा. कामोठेपुरा, नवी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतील गावात राहते. ती शिक्षण घेत आहे. रियाची ऑगस्ट २०२० मध्ये फेसबुकवरून समाधान पवार याच्याशी मैत्री झाली. त्याने तिच्याशी वारंवार चॅटिंग करीत मोबाईल क्रमांक मागितली. समाधान हा इंजिनिअर असून एका नामांकित कंपनीत नोकरी करतो. मोबाईल क्रमांक मिळविल्यानंतर दोघांचे संबंध वाढत गेले.

मुंबईच्या युवकाने भंडाऱ्यातील युवतीवर नागपुरात केला बलात्कार
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

तो २९ सप्टेंबर २०२० मध्ये नागपुरात आला. त्याने तिलाही भंडाऱ्यावरून नागपुरात बोलावले. त्याने सीए रोडवरील हॉटेल ओरियंटमध्ये रूम बूक केली. तेथील रूमवर रियाला घेऊन गेला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच बळबजरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन दिवस हॉटेलमध्ये थांबवून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार नागपुरात यायला लागला.

तो रियालाही बळजबरीने नागपुरात बोलावून घेत होता. अनेकदा शारीरिक संबंधास बळजबरी करीत असल्यामुळे तिने प्रेमसंबंध तोडण्याचे ठरविले. त्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतरही त्याने तिचे लैंगिक शोषन केले आणि लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडून रियाने भंडारा येथे तक्रार दिली. तेथून ती तक्रार नागपुरातील गणेशपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com