सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर अत्याचार; महिलांशी करायचा चॅटिंग

सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर अत्याचार; महिलांशी करायचा चॅटिंग

नागपूर : महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार (atrocity) करणाऱ्या युवकाविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अमोल ऊर्फ सक्षम मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपुरातील महिलेशी अनैसर्गिक कृत्य (Unnatural acts with a woman) करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Atrocities on social worker women in Nagpur)

३६ वर्षीय महिलेने लावलेल्या आरोपानुसार, आरोपी हा महिलेच्या घरी खोली भाड्याने घेण्याच्या नावाखाली आला होता. त्याने स्वत:ला देश-विदेशात राहत असल्याचे तसेच आपला बिझनेस असून २५ राष्ट्रांत नेटवर्क असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महिला त्याच्यावर भाळली. नंतर त्याने गृहस्थ जीवनात परत येऊन डिसेंबर २०२० मध्ये महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर तो तिच्याच बंगल्यावर राहू लागला. तो अनैसर्गिक संबंधासाठी बळजबरी करायचा. नकार दिला असता तो तिला बेदम मारहाण करायचा. त्याने तिला १० लाख रुपये व्यवसायाकरिता मागितले. तिने नकार दिला असता बेदम मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर अत्याचार; महिलांशी करायचा चॅटिंग
होमगार्डने केला डॉक्टर युवतीवर बलात्कार; वर्दीचा धाक दाखवून शोषण

आटोचालकाने केला युवतीचा विनयभंग

आटोचालकाने एकतर्फी प्रेमातून २८ वर्षीय युवतीचा वारंवार पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. विशाल अंबादास चरबे (३५, रा. जुनी मंगळवारी, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. युवतीने घरी पोहोचण्यासाठी विशालचा आटो केला होता. तेव्हापासून तो युवतीच्या मागे लागला. १ मे रोजी युवतीचा पाठलाग करीत तो आनंद बेकरीपर्यंत पोहोचला. युवतीच्या लक्षात प्रकार आल्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली.

पोलिसाच्या वाहनाला अपघात

पोलिसांच्या वाहनाला (एमएच-३१-एजी-९७८९) कारने (एमएच-३१ इके ६४७७) जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिस वाहनाचे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी कारमालक स्नेहाशिष गोपाल शर्मा (रा. वसंतविहार गोरवाडा बरडे लाऊट वय ४६), अमित शांतीलाल यादव (वय ३९ धरमपेठ), राम श्रावण बादिया (वय २७ रा. दंतेश्वरीनगर) या तिघांविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. अमित हा दारू प्यायला असल्याने त्याच्याविरुद्ध दारूबंदीचीही कारवाई करण्यात आली, अशी माहिती बजाजनगर पोलिसांनी दिली.

(Atrocities on social worker women in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com