Student Success : रिक्षाचालकाच्या मुलाने १००% गुणांसह जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला
100 Percent SSC : दिग्रसच्या दिनबाई शाळेतील विद्यार्थी प्रथमेश इंगोले याने दहावीत १००% गुण मिळवत जिल्ह्यात टॉपर ठरून रिक्षाचालकाच्या घराचं नाव उज्वल केलं.
दिग्रस : येथील एका रिक्षाचालकाच्या मुलाने दहावीत १०० टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. प्रथमेश साहेबराव इंगोले असे त्याचे नाव असून तो दिनबाई शाळेचा विद्यार्थी आहे.