
अमरावती : एकेकाळी महायुतीचे प्रमुख घटक असलेले माजी मंत्री व प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आता महायुती सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेणार असल्याचे मंगळवारी (ता. सात) अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आयोजित मेंढपाळ बांधवांच्या आंदोलनादरम्यान स्पष्ट केले. महादेव जानकर व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेल्या वाडा आंदोलनात मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.