नागपूर : मेडिकल चौकातील सेक्स रॅकेट छापा; मुलीसह दोघी ताब्यात

नागपूर : मेडिकल चौकातील सेक्स रॅकेट छापा; मुलीसह दोघी ताब्यात

नागपूर : मेडिकल चौकातील पॉश इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एका दलाल युवकाला अटक केली. सागर देवराव काजनीकर (२५) असे अटकेतील दलालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर काजनीकर (रा. कावरापेठ क्रॉसिंग, किनखेडे ले-आऊट, यशोधरानगर) आणि त्याची नातेवाईक नीतू कोहाड हे दोघे मेडिकल चौकातील अर्जून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ५१० मध्ये सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाला मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचला आणि पंटर पाठवून खात्री केली. शनिवारी दुपार तीन वाजता फ्लॅटवर पंटर पाठवला. त्याने १,५०० रुपयांत सौदा पक्का केला आणि १५ ते १६ वर्षीय मुलीची शारीरिक संबंधासाठी मागणी केली.

नागपूर : मेडिकल चौकातील सेक्स रॅकेट छापा; मुलीसह दोघी ताब्यात
विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?

सागरने लगेच होकार दिला आणि पैसे घेतले. त्याला फ्लॅटमधील एका खोलीत बसवून ठेवले आणि १६ वर्षीय मुलीला तेथे पाठवले. पंटरने लगेच सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले. तसेच दुसऱ्या रूममध्ये २७ वर्षीय महिलासुद्धा देहव्यापार करीत असल्याचे लक्षात आले.

दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागरला अटक केली. नीतू कोहाड ही फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने, एसीपी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनात पीआय भोसले, एपीआय मयूर चौरसिया, पीएसआय मंगला हरडे, नरेंद्र ठाकूर, रवींद्र शेंडे, प्रवीण अहीर आणि सागर ठाकरे यांनी केली.

नागपूर : मेडिकल चौकातील सेक्स रॅकेट छापा; मुलीसह दोघी ताब्यात
पर्यायी कार्यक्रमांची काँग्रेसची परंपरा कायम

अल्पवयीन मुलगी जबलपूरची

सागरने किरायाने सलून घेतले होते. तेथे तो वेगवेगळ्या मुलींना सेक्स रॅकेटसाठी ठेवायचा. अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील जबलपूरमधील आहे. ती वयाच्या १४ व्या वर्षांपासून देहव्यापार करते. तिची आई पळून गेली असून वडिलाने दुसऱ्या महिलेशी घरोबा केला आहे. ती मुलगी देहव्यापार करून शिक्षण घेते. सागरने तिला एका महिन्यासाठी बूक केल्याची माहिती आहे. तर दुसरी २७ वर्षीय महिलेचे लग्न झाले असून ती पतीपासून वेगळी राहत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com