

प्रा. डॉ. उल्हास मोगलेवार
बाराव्या शतकात भारतीय समाजाची विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन व शिथिल बनला होता. सतत होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे भारतीय समाजाला एकसंध व एकजिनसी बनविण्याची आवश्यकता होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी ''लिंगायत'' धर्माची पुनर्स्थापना करून साधले. म्हणूनच त्यांना बसवधर्माचे किंवा लिंगायत धर्माचे ''प्रवादी'' असेही म्हणतात. त्यांनी कायक, दासोह, सदाचार, सत्य, अहिंसा, अस्पृश्यता निवारण, जातीनिर्मूलन, साक्षरता, स्त्री शिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक मूल्यांवर भर दिला. त्यांनी इष्टलिंग, शिवयोग अथवा सहजयोग या संकल्पनेची महान देणगी भारतीय अध्यात्म शास्त्राला दिली.