तळघर आखाडा मंदिर बिल्डरच्या ताब्यात; पुजाऱ्याची उच्च न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai high court

तळघर आखाडा मंदिर बिल्डरच्या ताब्यात; पुजाऱ्याची उच्च न्यायालयात धाव

नागपूर - जुन्या भंडारा मार्गावरील दीडशे वर्षे जुने ऐतिहासिक तळघर आखाडा हनुमान मंदिर बिल्डरकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने नागपूर महापालिका आणि पोलिसांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझेस यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, जुन्या भंडारा मार्गावरील तळघर आखाडा हनुमान मंदिर १५० वर्षांपेक्षा जुने मंदिर आहे. सध्या हनुमानजींची प्राचीन मूर्ती जमिनीच्या पातळीपासून सुमारे १५ फूट खाली बसवण्यात आली असून, मूर्तीच्या शेजारी एक जुना आखाडा आहे. हे मंदिर वर्षानुवर्षे इतवारी परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून या पुरातन मंदिराच्या इमारतीशी छेडछाड सुरू असल्याने १४ जुलै रोजी इमारत कोसळली आणि ढिगाऱ्यामुळे मंदिरातील रेलचेल ठप्प झाली. पुरातत्त्व विभागही पुरातन मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने मूक बसून आहे. बिल्डरचा अतिरेक आणि संबंधित विभागाच्या नाकर्तेपणाला कंटाळून रामावतार शर्मा यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. कौशल त्रिवेदी यांनी बाजू मांडली.

मंदिराच्या मार्गावर मलबा

मंदिराची जागा बळजबरीने बळकावण्याच्या बिल्डरच्या प्रयत्नाला मंदिराचे पुजारी पं. रामावतार रामप्रसाद शर्मा यांनी विरोध केला. शर्मा यांच्या तीन पिढ्या मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत. बिल्डरने पं. शर्मा यांच्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप करत लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून मंदिराच्या मार्गावर साचलेला मलबा महापालिका प्रशासनाकडून हटवण्यात आलेला नाही. पं. शर्मा यांनी वारंवार विनंती करूनही सतरंजीपुरा झोनच्या पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

Web Title: Basement Arena Temple Possession Of Builder Nagpur News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurTemplesbuilder