
नागपूर : केंद्र आणि राज्यात सरकार असल्याने भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. १५१ जागांसाठी ६०० पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. काही माजी नगरसेवकांच्या कारभारावर पक्षातूनच नाराजी आहे. ५० टक्के महिला नगरसेविकाही भाजपच्या अहवालात नापास ठरल्या. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. अशात भाजपसमोर बंडखोरी थोपविण्याचे आव्हान राहणार आहे. काँग्रेसला नेहमीप्रमाणे गटबाजीचा फटका बसण्याची भीती आहे.