
नागपूर : काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ओबीसीमधून आरक्षण द्यावे का याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस तर नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली. कॉंग्रेसने ओबीसीला कधीही न्याय दिला नाही, असेही ते म्हणाले.