
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसचा अपमान केल्याची टीका केली. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने किती अपमानित व्हायचे आहे, याचा विचार करावा, असा टोलाही माध्यमांशी बोलताना त्यांनी लगावला.