

Nagpur News
esakal
बाजारगाव: नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथील कुंभार पुरा परिसर एकेकाळी मातीच्या सुगंधाने दरवळणारा आणि कुंभारांच्या कलेने समृद्ध होता. मात्र आज महागाई, मातीचा तुटवडा आणि बदलत्या बाजारपेठेमुळे हा पारंपरिक व्यवसाय अस्तित्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पिढ्यानपिढ्या मातीतून जीवन घडवणाऱ्या कुंभार समाजाचा व्यवसाय हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.