प्लीज! लक्ष्मणरेषा ओलांडू नका, ज्येष्ठ नागरिकांचा नागपूरकरांना समजूतदारपणाचा सल्ला

Be aware in corona days, senior citizens advice to people
Be aware in corona days, senior citizens advice to people
Updated on

नागपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असले तरी अजूनही अनेक जण लॉकडाउन तसेच "सोशल डिस्टन्सिंग'चे नियम पाळताना दिसत नाही. मूठभर लोकांच्या बेफिकीर वागण्याने शहरात कोरोना हातपाय पसरत आहे. सरकारने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने ही स्थिती उद्भवली. नागपूरकरांनी वेळीच आपल्या वागण्यावर आवर न घातल्यास भविष्यात पश्‍चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते, असा सल्लावजा इशारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिला.
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ज्येष्ठ नागरिक कमालीचे व्यथित आहेत. विशेषतः विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. आम्ही ज्येष्ठ शासनाचे आदेश पाळत असताना तरुणाई समजूतदारपणा का दाखवत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने काही ज्येष्ठ नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या असता, त्यांनी या आणीबाणीच्या काळात नागपूरकरांना संयमाने वागण्याचे आवाहन केले.


रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्यावा

सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष हुकूमचंद मिश्रिकोटकर लॉकडाउनमध्ये कोरोनापासून दूर राहण्यासाठी सध्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही विशेष काळजी घेत आहोत. नियमित व्यायामाशिवाय काढा व हळदमिश्रित दुधाचे सेवन करतो. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमचा भरपूर विरंगुळा होत असल्याचे ते म्हणाले.


सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न : वानखडे

फेस्कॉमच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बबनराव वानखडे म्हणाले, सरकारने आम्हाला विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले असून, त्याचे सर्व तंतोतंत पालन करीत आहोत. व्हॉट्‌सऍप ग्रुप किंवा फोनच्या माध्यमातून इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांना "सोशल डिस्टन्सिंग' पाळण्याबाबत माहिती व मार्गदर्शन करीत आहे. अन्नधान्य वाटप आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईकरिता पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्यभरातून आर्थिक मदत गोळा करून सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.

"सोशल डिस्टन्सिंग' पाळा : चिंचोलीकर

सुरेंद्रनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य असलेल्या माधवी चिंचोलीकर यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना "सोशल डिस्टन्सिंग' पाळण्याचे व घरांमध्ये राहण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, कोरोनाचे संकट फार मोठे आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःवर बंधने लादून सरकारने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेचे पालन करणे आवश्‍यक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य पावले उचलण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com