

Nagpur News
esakal
नागपूर: कधीकाळी ‘बेसा’ हे गाव होते. या गावाची लोकसंख्या केवळ तीनशेच्या घरात होती. अलीकडे या भागाचे शहरीकरण झाले. बेसा नगरपंचायत तयार झाली. लोकसंख्या झपाट्याने वाढली, वाहतूक वाढली. मात्र, येथील मुख्य चौकाची अवस्था अतिशय दयनीय आहे. चौकातील खड्डे, चारही कोपऱ्यात अस्वच्छतेचा कळस दिसतो. बेसा चौकाचे सौंदर्यीकरण कधी होईल, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.