Bhagar Price : सणासुदीत उपवासाची भगर महागली; इतर साहित्य स्थिर, उपवास सर्वसामान्यांचा आवाक्यात
Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीसह येणाऱ्या सण उपवासांच्या पार्श्वभूमीवर भगरचे दर वाढले असले तरी इतर फराळसामग्री स्थिर आहे. त्यामुळे सर्वसामान्य उपवासींचा बजेट फारसा बिघडलेला नाही.
नागपूर : आषाढी एकादशी तीन दिवसावर आली असून पुढे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक सण आहेत. विशेष म्हणजे या सणांना उपवास आणि व्रताचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.