

Success Story
sakal
नागपूर : संकटे कितीही मोठी असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवता येते, हे नागपूरच्या भाग्यश्री राजेश नैकाले हिने सिद्ध करून दाखवले आहे. आर्थिक अडचणींवर मात करत तिने कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता केवळ स्व-अभ्यासाच्या बळावर संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत ६४७ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.