Bhandara paddy farmers await the opening of government procurement centres and payment of pending bonuses ahead of Diwali.
esakal
अमित मेश्राम
तुमसर(जि.भंडारा) : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आणि बाजारात हलक्या धानाची आवक व विक्री सुरू झालेली असताना, शासकीय धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी हमीभावाने धान विकण्याची प्रतीक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील अन्नदात्याची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ऐन सणासुदीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना नाइलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकावे लागत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.