Kiran Patankar: 'भीमराज की बेटी’ फेम किरण पाटणकर यांचं निधन; कव्वाली झाली पोरकी!

‘भीमराज की बेटी’ अशी सामाजिक ओळख असलेली प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर (रोडगे) यांचे बेझनबागेतील राहत्या घरी निधन झाले.
Kiran Patankar: 'भीमराज की बेटी’ फेम किरण पाटणकर यांचं निधन; कव्वाली झाली पोरकी!
Updated on

Kiran Patankar Passed Away: आंबेडकरी प्रबोधन चळवळीला ऊर्जा देणारे लोकगीतकार नागोराव पाटणकर यांचा क्रांतीनाद अधिक व्यापक पद्धतीने मांडणारी त्यांची मुलगी तर समाजासाठी ‘भीमराज की बेटी’ अशी सामाजिक ओळख असलेली प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर (रोडगे) यांचे बेझनबागेतील राहत्या घरी निधन झाले.

त्या ६२ वर्षांच्या होत्या. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे, मात्र किरण पाटणकर यांच्या निधनाने कव्वाली मात्र पोरकी झाली असल्याची भावना व्यक्त केली.

भीमकन्या असलेल्या कव्वाल किरण पाटणकर यांच्या गाण्यांनी एकूणच आंबेडकरी सांस्कृतिक मनावर अमिट छाप सोडलेली आहे. त्यांचा जन्म बडनेरा (जिल्हा अमरावती) येथे झाला. त्यांचे वडील नागोराव पाटणकर यांनी बाबासाहेबांची धम्मक्रांती झपाटल्यागत साता समुद्रपार पोचवली.

दीक्षाभूमी असलेल्या शहराच्या सावलीत पाटणकर कुटुंब नागपूरला स्थायिक झाले. वडील नागोराव यांच्या पावलावर पाऊल टाकत भाऊ प्रकाश आणि किरण यांनी गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. किरण यांच्या बालमनावर लहानपणापासूनच कव्वालीचे संस्कार झाले. लोकगायक म्हणून नावारूपास येत असतानाच त्या काळात गावोगावी मंडई, शंकरपट, मेळावे अशा कार्यक्रमांमधून किरण यांच्या कव्वालीचा बाज बहरत गेला.

आंबेडकरी जलशांमधून किरण पाटणकरांचा आवाज घुमत गेला. आनंद शिंदे, जानीबाबू, मज्जिद शोला अशा त्या काळातील मोठमोठ्या गायकांसोंबत किरण यांचा दुय्यम कव्वालीच्या सामन्यांची लोक आतुरतेने वाट पाहायचे. विशेष असे की, किरण यांचे सख्खे भाऊ प्रकाश पाटणकर यांच्यासोबतही कव्वालीची दुय्यम रंगत असताना आंबेडकरी गीतांतून आंदोलनाला बळ देण्यासाठी प्रचंड उर्जा मिळत होती.

स्त्री लोकगायिकेतील एक झंझावात
किरण पाटणकर यांचे नाव घेतले की ८० च्या दशकातील काळ आठवतो. मुंबई पुण्यातील नावाजलेल्या कव्वालांसोबत दुय्यम करणाऱ्या किरणताई पहाट होईपर्यंत गात राहायच्या. सर्व स्तरावर त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते.

‘बंधू रं शिपाया.. दे रे दे रुपया, चोळीच्या खनाला रं दिवाळीच्या सणाला..या गीतात त्या एका गरीब बहिणीची वेदना सादर करताना उपस्थित महिलांच्याच नव्हे तर भावांच्या, वडिलांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहायचे. त्यांची बेधडक गायकी आता होणार नाही, अशी आदरांजली व्यक्त करण्यात आली.

नगरसेवक ते लोकसभेची निवडणूक
सांस्कृतिक मन तयार करण्यासाठी लोककलावंतांचा मोठा वाटा आहे. यामुळेच त्यांनी नगरसेवकाची निवडणूक जिंकली. बहुजन समाज पक्षातर्फे त्यांनी ही निवडणूक लढविली होती. रामटेक लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढविली होती. यात त्यांनी ९५ हजार मते घेतली होती.

Kiran Patankar: 'भीमराज की बेटी’ फेम किरण पाटणकर यांचं निधन; कव्वाली झाली पोरकी!
Share Market Today: आज शेअर बाजारात पुन्हा घसरण होणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com