

teachers await relief as Maharashtra government
अमरावती : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त सापडल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे.