Nagpur : कुक्कुटपालनाबरोबर चिकन प्रोसेसिंगचे मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येथील शेतातील पोल्ट्री फार्म.

Nagpur : कुक्कुटपालनाबरोबर चिकन प्रोसेसिंगचे मार्गदर्शन

Pune - ब्रॉयलर (मांसासाठीचे पक्षी) पोल्ट्री उद्योगातील संधी, अंदाजे गुंतवणूक, पक्ष्यांचे खाद्य, आजार, लसीकरण, पोल्ट्रीचे अर्थशास्त्र, मार्केटिंग व्यवस्थापन, बँक फायनान्स, करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग, टेक्नो कमर्शिअल आस्पेक्ट,

चिकन प्रक्रिया, चिकन पदार्थांचे मूल्यवर्धन इ. विषयी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण ११ व १२ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र दिले जाणार असून या क्षेत्रात उतरू पाहणारे शेतकरी, युवावर्गासाठी हे प्रशिक्षण फायदेशीर ठरणारे आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी पोल्ट्री फार्मला शिवार फेरीचे आयोजन आहे. चहा, जेवण, प्रमाणपत्र व शिवारफेरीसह प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार पाचशे रुपये आहे.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

मधमाशी पालन केवळ मधासाठी नसून परागीभवनासाठीही आहे. ज्याद्वारे पीक उत्पादन वाढीस मदत होते. अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसून आल्याने या व्यवसायात भरपूर वाव आहे. मधमाशीपालन व्यवसाय म्हणून कसा करावा,

मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशीपालनात उद्योजक कसे व्हावे याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा १७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. ज्यात मधमाशांचे महत्त्व, विविध जाती, जीवनचक्र, वसाहतींचे व्यवस्थापन, मधमाशा हाताळणी, काळजी, मधमाशांपासून मिळणारे उपपदार्थ, मध प्रक्रिया इ.

विषयी मधमाश्‍यांच्या संवर्धनात अनेक वर्षांपासूनचा प्रॅक्टिकल अनुभव असणारे तज्ज्ञ हेमंतकुमार डुंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसांपैकी एक दिवस संपूर्ण प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये.