
नागपूर : मित्राच्या वाढदिवस असल्याने मित्रांसह रिसॉर्टवर पार्टी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा स्वीमिंग टॅकमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२९) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.