
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजप तसेच महायुतीसाठी सर्व घटकांना पुन्हा जवळ घेण्यासाठी ‘संघ परिवार’ अॅक्टिव्ह झाला आहे. प्रत्येक घरापर्यंत जाऊन भाजप तसेच महायुतीचे शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी थेट मतदारांशी संपर्क केला जात आहे. यासाठी बूथ लेवल यंत्रणा तयार करण्यात आली असून एक हजार लोकसंख्येमागे सात ते आठ जणांची टीम काम करीत आहे.