
आनंदराज आंबेडकर म्हणाले, राज्य सरकार अस्थिर करून...
नागपूर : हनुमान चालिसा, भोंग्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. काहींना सुपारी देऊन सरकार अस्थिर करून राष्ट्रपती शासन लागू करण्याचा प्रयत्न भाजप असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, राज्यात धार्म व जातीच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईतील लोक चिंतेत आहे. भोंग्याचा वाद दुर्दैवी आहे. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला पाहिजे.
परंतु काहींना सुपारी देऊन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपचा हा सर्व खटाटोप सुरू असल्याटी टीका त्यांनी केली. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. लोकांनी आपल्या धार्मिक विधी घरात कराचला पाहिजे. इतरांच्या घरात नाही. महागाई, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या भोंग्याच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी विरोधात आवाज उचलला पाहिजे, असे ते म्हणाले. या सर्व प्रकारामुळे राज्याचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. शेती कामासाठी पर्याप्त वीज मिळाली पाहिजे.
यासाठी उद्योगाची वीज केलेली तरी चालेल. पाणी अभावी पीक करपत आहे. त्यांना पाण्यासाठी विजेची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, महासचिव प्रा. युवराज धसवाडीकर, सचिव भैया भालेराव, भूषण भस्मे,धर्मपाल वंजारी, शरद दंढाळे, नीलेश खडसन, मनीष रंगारी,राजू मेश्राम सुरेंद्र मस्के अरविंद कारेमोरे उपस्थित होते.
पटवर्धन मैदानावर आंबेडकर स्मारक उभारा
पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्याचा निर्णय २५ वर्षापूर्वी घेण्यात आला. परंतु अद्याप ते उभारण्यात आले नाही. हे दुर्दैव आहे. तीन महिन्यात जागा न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असे ते म्हणाले. अंबाझरी उद्योनात आंबेडकर भवन तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.
पावसाळ्यात निवडणुका अश्यक्य
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेले. सरकारच्या चुकीमुळे त्यांना आरक्षण मिळणार नाही. आरक्षण मिळण्यासाठी त्यांना लढा उभारावा लागेल. परंतु जातीपातीत ते विखुलरे असल्याने एकसंघ नाही. याचा फटका त्यांना बसत आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यानंतरच त्या होतील, असे ते म्हणाले.
Web Title: Bjp Attempt To Create Religious Rift Presidential Rule Republican Sena Anandraj Ambedkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..