esakal | ED कडे अनेक मंत्र्यांचा नंबर लागणार, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

ED कडे अनेक मंत्र्यांचा नंबर लागणार, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) , परिवहनमंत्री अनिल परब (minister anil parab) हे जास्त दिवस ईडीला टाळू शकणार नाहीत. काही केले नाही असा त्यांचा दावा आहे तर मग सामोरे का जात नाही? असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp state president chandrakant patil) यांनी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा नंबर लागणार आहे असे सांगून सरकारला एकप्रकारे इशाराच दिला.

हेही वाचा: भाजपला जनता फळ म्हणून नारळ देणार; काँग्रेसचा गडकरींवर शरसंधान

पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. आमदार गिरीश व्यास यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री झाले म्हणून कोणालाच इडीला टाळता येणार नसल्याचे सांगितले. नोटीस बजावल्यावर चौकशीला जायला हवे होते. अनिल देशमुखांचा टाळाटाळ करण्याचा कित्ता परब गिरवीत आहे. त्यांनी कितीही बहाणे केले तरी, सक्तवसुली संचालनालय त्यांची चौकशी करणारच आहे.

मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस येताच शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकली आहे. भ्रष्ट मंत्र्यांची भली मोठी यादी आहे. अनेक जण रांगेत आहेत. काही जण सुपात आहेत, तर काही जात्यात. तपास यंत्रणा त्यांचे काम चोखपणे करते आहे. ते आणखी माहिती काढतील. मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. तरीही आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडी अटोकाट प्रयत्न करीत आहे. पण ते वाचणार नाहीत. चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जातेय

राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत आहे. जनता कंटाळून रस्त्यावर उतरण्याआधीच सरकारने सुधारायला हवे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले. पण अजून त्याला अटक झालेली नाही. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना क्लीन चीट देऊन पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाटील म्हणाले.

loading image
go to top