BJP
नागपूर - महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ३२ जणांवर भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीची कारवाई करून निलंबित केले आहे. त्यात पाच वेळा नगरसेवक राहिलेले ज्येष्ठ नेते सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक भगवान मेंढे, माजी नगरसेवक दीपक चौधरी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी नगरसेविका नसिमाबानो आदींचा समावेश आहे. या ३२ जणांना तब्बल ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.