
नागपूर : भारतीय जनता पार्टीचे धामणगाव येथील आमदार प्रताप अडसड यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विरेंद्र जगताप आणि जळगाव जामोद येथील संजय कुटे यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका केल्या आहेत. या याचिका दाखल करताना नियमांचे पालन न झाल्याचा दावा करीत त्या फेटाळून लावण्याची मागणी अडसड व कुटे यांनी केली आहे.