esakal | Sunil Kedar : "भाजपने खासगीकरणाचा सपाटा लावला"
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Kedar : "भाजपने खासगीकरणाचा सपाटा लावला"

Sunil Kedar : "भाजपने खासगीकरणाचा सपाटा लावला"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या मेहनतीने देशाला उभे करून आत्मनिर्भर बनवले. मात्र सत्तेवर येताच सरकारी कंपन्या विकण्याचा, शासकीय यंत्रणाचे खाजगीकरण करण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. देशाला उद्योजकांच्या हातात देण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.

नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचार सभेत मंत्री सुनील केदार बोलत होते. नागपूर ग्रामीण भागातील गोधणी- बोखारा सर्कल मधील फेटरी, वलनी, ब्राम्हणवाडा, भरतवाडा, पिठेसुर, लोणारा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, बोखारा, गोधणी इत्यादी भागात सुनील केदार यांनी प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यात आयोजित सभेत मंत्री सुनील केदार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. केदार यांनी सांगितले की, या देशाची औद्योगिक प्रगती ही काही एका दिवसात झालेली नाही. मागील सत्तर वर्षातील काँग्रेस शासनाने केलेल्या कार्याचे प्रतीक आहे.

परंतु केंद्रातील भाजप शासनाने मात्र या सर्व संस्थांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. अशा असंवेदनशील लोकांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा मतरुपाने जनतेने दाखवून द्यावी, असे केदार म्हणाले. प्रचार सभांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री रमेश बंग, आमदार विकास ठाकरे, माजी आमदार विजय घोडमारे, नागपूर ग्रामीण पंचायत समिती उपसभापती संजय चिकटे,गोधणी- बोखारा सर्कलच्या उमेदवार कुंदा राऊत, रत्नदीप रंगारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

loading image
go to top