bjp party winner in nagpur municipal election celebration
sakal
नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपच ‘किंग’ठरला आहे. कॉंग्रेसने यंदा ‘मिशन १००’नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले होते. परंतु शहरात सुरू असलेली विकासकामे, भाजपचे असलेले बळकट संघटन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर असलेला नागपूरकरांच्या विश्वासाने पुन्हा एकदा मनपाच्या चाव्या भाजपच्या हाती दिल्या आहेत.