
नागपूर : स्थानिक स्वराज्य निवडणूक आजही झाल्यास भाजप तयार आहे. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बूथपर्यंत आमचे संघटन झाले आहे. कार्यकारिणी पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मेळावे घेतो आहे. धाराशिव, बुलडाणा या भागात मी जाणार आहे. विधानसभेत ५१.७८ टक्के मत घेऊन आम्ही जिंकलो होतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.