

BJP Faces Fresh Infighting as Leaders Seek Action Against Navneet Rana
Sakal
अमरावती: महापालिका निवडणुकीनंतर आता भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा उफाळून आला आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आमच्या पराभवासाठीच काम केल्याचा आरोप करण्यात आला असून त्या पक्षविरोधी असल्याने त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात यावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रावर विजयी झालेल्या व पराभूत उमेदवारांच्या स्वाक्षरी आहेत.