Blood Shortage : कुणीतरी रक्त देता का रक्त..! मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटीत तुटवडा

Blood Shortage : गरीब रुग्णांसाठी मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हेच आरोग्यासाठीचे आधार आहेत.
Blood Shortage
Blood Shortageesakal

Blood Shortage : गरीब रुग्णांसाठी मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हेच आरोग्यासाठीचे आधार आहेत. पाच राज्यातील गरीब जनता येथे उपचारासाठी येते. मात्र गावखेड्यातून तसेच अतिदुर्गम भागातून येणाऱ्या अत्यव्यस्थ रुग्णांवर ‘कोणीतरी रक्त देता का रक्त’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मेयो, मेडिकलसह सुपरमध्ये सर्वच गटातील रक्ताचा तुटवडा पसरला आहे.

एकूण नागपूरचा विचार करता शहरात असलेल्या ७०० पेक्षा अधिक लहान मोठ्या रुग्णालयात दर दिवसाला सुमारे १ हजार रक्त पिशव्यांची गरज आहे. आजच्या स्थितीत मेयो, मेडिकलमध्ये ए-निगेटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नाही. याशिवाय इतर रक्तगटाच्या बोटांवर मोजण्याइतक्या रक्तपिशव्या उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली आहे. सुपर स्पेशालिटीत बी-निगेटिव्ह आणि एबी निगेटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

येत्या काही दिवसात स्वेच्छा रक्तदानाचा टक्का न वाढल्यास मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्थिती बिघडून त्याचा फटका रुग्णांना बसणार आहे. विशेष असे की, शस्त्रक्रियांनाही ब्रेक लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मेडिकल, सुपरसह मेयोत विदर्भासहित तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकांना रक्ताची गरज भासते. या लॉकडाउनमुळे मेडिकल, सुपरमधील रक्त युनिट शिल्लक नसल्याची माहिती पुढे आली आहे. रक्ताच्या तुटवड्यासंदर्भात मेडिकलच्या रक्तपेढीच्या प्रमुखांनी मात्र बोलण्यास नकार दिला.

Blood Shortage
Low Blood Sugar : तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे की नाही? 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच व्हा सावध

रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या रोडावली

मेयो, मेडिकलसह सुपरमध्ये दाखल असलेल्या रुग्णासोबत असलेले नातेवाइक पूर्वी रक्तदान करीत होते. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र अलीकडे रुग्णासोबत असलेले नातवाईक रक्त देण्यास इच्छुक नसतात. तर अनेक वॉर्डातील डॉक्टर उद्या शस्त्रक्रिया आहे, अशावेळी ऐनवेळी रक्ताची जुळवाजुळव करण्यास सांगतात.

अशावेळी मात्र खासगी रक्तपेढीतून रक्ताच्या पिशव्या खासगीतून मागवण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. अपघातग्रस्तांसाठी तत्काळ कोणत्याही क्षणी शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासते अशावेळी रक्त विकत आणण्याशिवाय नातेवाइकांनी पर्याय नसतो.

Blood Shortage
Blood Donation: रुग्णासह रक्तदान करणाऱ्यांनाही होतात 'हे' मोलाचे फायदे

रक्तदानासाठी पुढे या : डॉ. अविनाश गावंडे

मेडिकल असो की, सुपर ही गरीबांची रग्णालये आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. डॉक्‍टरांनी रक्ताची गरज सांगितल्यावर रुग्णाचे नातेवाईक चिंतेत पडतात. ऐनवेळी कुठे जावे? काय करावे? जास्त युनिट रक्त लागणार असेल तर त्यांच्या खर्चाची चिंताही असतेच. रक्तदानाचा खरा सेवाधर्म पाळणाऱ्या रक्तदात्यांची आठवण होते.

रक्तदान ही गरीब रुग्णांची एकप्रकारे लोकसेवा आहे. स्वेच्छेने रक्तदान केल्यास गरजूंना रक्त मिळेल. त्यांचा जीव वाचवण्याचे पुण्यही मिळेल. यामुळे स्वेच्छा रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com