दुर्दैवी! रेल्वे स्थानकावर आढळला वृद्धाचा मृतदेह; तीन दिवसांपासून मदत न मिळाल्यानं भूकबळीची शक्यता 

body of old man found at Nagpur railway Station today
body of old man found at Nagpur railway Station today
Updated on

नागपूर ः आपत्कालीन प्रसंगात तातडीने मदत मिळत असल्याची नागपूर रेल्वे स्थानकाची ख्याती आहे. पण, या ख्यातीला डागाळणारी घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी वृद्ध व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. गेल्या तीन दिवसांपासून तो एकाच ठिकाणी पडून राहिला. याकाळात जेवण किंवा वैद्यकीय मदत मिळाली नाही. जेवण -पाणी व उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू झाल्याचा दावा रेल्वे स्थानकावरील घटकांनी केला आहे.

मृत वृद्धाची ओळख पटू शकली नाही. ते सुमारे ६५ वर्षे वयोगटातील आहे. ते फलाट क्रमांक १ वरील मुंबई एण्डच्या दिशेने असलेल्या जनरल वेटींग हॉलमध्ये पडून होते. कोणतीही हालचाल करीत नसल्याने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडून या प्रकाराची माहिती रेल्वे रुग्णालय व लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. रेल्वेचे डॉ. सुमीत यांनी घटनास्थळ गाठून वृद्धाची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लोहमार्ग पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडीत मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवून दिला.

घटनास्थळी गोळा झालेल्या कर्मचाऱ्यांनी सदर वृद्धा तीन दिवसांपासून येथेच पडून असल्याचा दावा केला. नागपूर रेल्वे स्थानकावर कोनोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. कनफर्म तिकीट असल्या शिवाय कुणालाही आत प्रवेश दिला जात नाही. यानंतरही संबंधित वृद्ध रेल्वेस्थानकावर आलाच कसा ही चर्चा सुरू झाली. रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती खालावल्याने वृद्धाला अन्य प्रवाशांनी खाली उतरविल्याचा दावा काही उपस्थितांनी केला. 

तर, काहींच्या मते प्रकृती घालावल्याने उपचारासाठी तेच खाली उतरले. अंगात त्राणच नसल्याने ते आपली व्यथा कुणालाच सांगू शकले नाही. पाणी- जेवण आणि उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा करण्यात येणारा दावा रेल्वे स्थानकावरील यंत्रणांच्या असंवेदनशीलतेकडे अंगुलीनिर्देश करणारा ठरला आहे. शनिवारी सकाळपर्यंत वृद्धाचा हालचाल सुरू होती. त्यानंतर मात्र सर्वच शांत झाल्याचे काहींचे म्हणने पडले. या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com