

Bombay High Court
sakal
नागपूर : केवळ शिवीगाळ किंवा अपमानजनक शब्द बोलणे हे स्वतः गुन्हा नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निकालात नोंदविले. बोललेले शब्द अश्लील असतील, त्यामुळे कोणाचा वास्तववादी अपमान किंवा त्रास झाला असल्यास भारतीय दंड संहितेची कलम २९४ (बी) लागू होईल, याचा दाखला न्यायालयाने आपल्या आदेशात दिला.