

Nagpur
esakal
नागपूर: गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली रात्री उशिरा एका महिलेच्या घरात वारंवार प्रवेश करून तिची चौकशी करणे आणि तिचा मोबाइल बेकायदेशीररीत्या ताब्यात घेणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी महिलेच्या गोपनीयतेच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठेवला आहे. तसेच, राज्य शासनाला दहा हजार रुपये दंड ठोठावला.