esakal | दोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले धक्कादायकच !
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणाः पत्नी व दोन मुलींसह सीआरपीएफ शहीद जवान नरेश बडोले.

बाबा आता घरी परतणार, अशी आशा मुलींना लागली होती. बरेच दिवसांनंतर बाबा येईल, कोरोनाच्या काळात कुटुंबीय एकाकी झाले होते. बाबा आल्यावर पुन्हा घरात आनंद येईल, असे वाटत असतानाच बाबा शहीद झाल्याची वार्ता कळताच कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

दोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले धक्कादायकच !

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि.नागपूर): त्यांचे निवासस्थान हिंगणा मार्गावरील वैशालीनगर येथे आहे. पत्नी प्रमिला, मृणाल (२२) व प्रज्ञा (२०) या दोन मुलींसह या ठिकाणी राहतात. बाबा आता घरी परतणार, अशी आशा मुलींना लागली होती. बरेच दिवसांनंतर बाबा येईल, कोरोनाच्या काळात कुटुंबीय एकाकी झाले होते. बाबा आल्यावर पुन्हा घरात आनंद येईल, असे वाटत असतानाच बाबा शहीद झाल्याची वार्ता कळताच कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

अधिक वाचाः खर्च १२ कोटी, पुलाची वयोमर्यादा फक्त दोन वर्ष? पारशिवनीकरांना पडला ‘पेंच’....
 

वैशाली नगर येथील निवासस्थानी स्मशानशांतता
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात गुरूवारी( ता.२४) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपुरातील सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आले. एसआरपीएफ कॅम्पजवळील वैशाली नगर येथील त्यांच्या निवासस्थानी स्मशानशांतता होती. पत्नी व मुलींना त्यांची घरी येण्याची प्रतीक्षा लागली होती. शहीद होण्याची वार्ता कुटुंबीयाच्या कानी पडतात संपूर्ण कुटुंबीय शोक सागरात बुडाले. आता बाबा कधीच येणार नाहीत, हे समजताच मुलींचा शोक अनावर झाला.

बडगाम जिल्हयात दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद
वीरमरण आलेल्या सीआरपीएफ कॅम्पमधील जवानाचे नाव नरेश उमराव बडोले (५१) आहे. गोंदिया जिल्ह्यातील ते मूळ निवासी आहेत. १९८९ मध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये त्यांना नोकरी लागली होती. ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. मागील काही महिन्यांपासून ते जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात होते. २४ सप्टेंबर रोजी पहाटे दहशतवाद्यांनी बडगाम  जिल्हयात गोळीबार केला. याठिकाणी नरेश बडोले कामावर तैनात होते. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचे वृत्त नागपूर सीआरपीएफ कॅम्पमध्ये धडकतात सर्वत्र शोककळा पसरली. त्यांचे निवासस्थान हिंगणा मार्गावरील वैशालीनगर येथे आहे. पत्नी प्रमिला, मृणाल (२२) व प्रज्ञा (२०) या दोन मुलींसह या ठिकाणी राहतात. बाबा आता घरी परतणार, अशी आशा मुलींना लागली होती. बरेच दिवसांनंतर बाबा येईल, कोरोनाच्या काळात कुटुंबीय एकाकी झाले होते. बाबा आल्यावर पुन्हा घरात आनंद येईल, असे वाटत असतानाच बाबा शहीद झाल्याची वार्ता कळताच कुटुंबीयांना जबर धक्का बसला. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

हेही वाचाः खबरदार! जर एकही मृत्यू झाला तर, वाडीवासींनी दिला गंभीर इशारा...
 

सारेच हळहळले
नागपूर सीआरपीएफ कॅम्प पश्चिम उत्तर क्षेत्रात मोडते. यामुळे मुंबई येथून आईजी संजय लाटकर स्वतः शहीद जवानाचे शव श्रीनगर येथून विमानाने नागपूर येथे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी सीआरपीएफ नागपूरचे डीआयजी संजय कुमार व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहे. वैशालीनगरातील घरासमोर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र बाबाला देवाने हिरावल्याने बडोले कुटुंबीयांना जबर धक्का बसला, एवढे मात्र निश्चित.

संपादनः विजयकुमार राऊत

loading image