Women Empowerment : पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात युवा ‘अपेक्षा’ची भरारी; दृढ निश्चय, कष्टाच्या बळावर केले संधीचे सोने
Startup Story : एमबीए केल्यानंतर पुरुषप्रधान मेटलशिट व स्टेनलेस स्टील उद्योगात यश मिळवणारी अपेक्षा रामटेके ही नागपूरची तरुणी नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तीन वर्षांतच तिने स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या उभा केला आहे.
नागपूर : दृढ निश्चय, कष्टाची तयारी, संधीचे सोने करण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर अपेक्षा अत्तदीप रामटेके या युवतीने मनुष्यबळ संसाधनात एमबीए आणि मार्केटिंग क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.