esakal | नागपुरात ८५० सराफा व्यापाऱ्यांना नोटीस, जुने अन् बनावट हॉलमार्किंगमुळे फसवणुकीची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

८५० सराफा व्यापाऱ्यांना नोटीस, बनावट हॉलमार्किंगमुळे फसवणुकीची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील ८४५ सराफा व्यापाऱ्यांना (gold traders nagpur) भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) (BSI) नोटीस बजावली आहे. त्यात सराफा व्यापाऱ्यांना जुन्या हॉलमार्किंगच्या दागिन्यांची (hallmark jewelry) संपूर्ण माहिती मागितली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. सरकारची यंत्रणा असलेल्या बीआयएसला हॉलमार्क करणाऱ्या यंत्रणेवर विश्वास नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (bsi notice to 845 gold traders of nagpur for old hallmark jewelry))

हेही वाचा: हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार?

बीआयएसने पाठविलेल्या नोटीसमध्ये १५ दिवसात संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे. तर व्यापाऱ्यांनी स्टॉकची माहिती बीआयएसला उपलब्ध करणे अशक्य असल्याने माहिती देऊच शकत नाही. तशी माहिती देणे म्हणजे रेतीतून सुई शोधण्यासारखे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच दिलेल्या मुदतीत माहिती न दिल्यास आणि जुन्या हॉलमार्कचे दागिने मिळाल्यास व्यापाऱ्यांवर सक्ती करण्यात येईल, असे कडक शब्दांत बीआयएसने बजावले आहे. वास्तवात बीआयएसला आपल्या जुन्या हॉलमार्किंग केंद्रांवरच विश्वास नाही. ब्युरोला शंका आहे की, केंद्राने रेकॉर्ड नसलेले हॉलमार्किंग जारी केले आहे. त्यामुळे जुने आणि बनावट हॉलमार्कचे दागिने असल्यास ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता विभागाला वाटत आहे. ही बाब लक्षात घेता जुन्या मालाचा रेकॉर्ड पुन्हा तयार करण्यात येणार आहे. जर रेकॉर्ड योग्य असेल तर सराफा व्यापारी जुन्या हॉलमार्कचे दागिने विकू शकतात. पूर्वी हॉलमार्किंगच्या दागिन्यांमध्ये चार मार्क लावण्यात येत होते. त्यात बीआयएसचा लोगो, कॅरेट शुद्धता, हॉलमार्किंग सेंटरचा कोड आणि ज्वेलरचा कोड असायचा. परंतु, आता या प्रक्रियेत बदल केला आहे. आता फक्त तीनच मार्क लावण्यात येत आहे. यात बीआयएसचा लोगो, कॅरेट शुद्धता आणि यूआयडी आधारित चिन्हाचा वापर करण्यात येत आहे.

सराफा व्यापाऱ्यांना मिळालेल्या नोटीसमुळे सरकारविरुद्ध नाराजीचा सुर उमटला आहे. स्टॉकची माहिती देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. स्टॉकची माहिती मागण्याचा बीआयएसला अधिकारच नाही. यावरूनच सरकारला आपल्याच केंद्रावर विश्वास नाही, हे स्पष्ट होत आहे. याच कारणामुळेच व्यापारी हॉलमार्कमध्ये नोंदणी करण्यास इच्छुक नव्हते. शहरातील ३५०० व्यापाऱ्यांपैकी ८४५ व्यावसायिकांनीच नोंदणी झाली आहे. आता त्यांना नोटीस मिळत आहे. हे अन्यायकारक आहे.
-राजेश रोकडे, सचिव, सोने-चांदी ओळ कमिटी
loading image