
नागपूर : विधानभवनाच्या समोरील एन. कुमार यांची इमारत पाडावी लागण्याची शक्यता आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (व्हीएनआयटी) सादर केलेल्या अहवालात या इमारतीची रचना पूर्णतः व्यावसायिक वापरासाठी असल्याचे नमूद केले आहे. ती विधानभवनाच्या प्रशासकीय वापरासाठी उपयुक्त नाही, असे स्पष्ट केल्याने इमारतीवर बुलडोझर चालवण्याची वेळ येणार आहे.