Buldhana Crime Case
esakal
बुलढाणा : मेहकर येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून (Buldhana Crime Case) गेला आहे. बेरोजगारीचे नैराश्य आणि पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून एका सुशिक्षित तरुणाने आपल्या पत्नीची आणि चार वर्षांच्या निष्पाप मुलाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी राहुल मस्के याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप दिसून आला नसल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.