
नागपूर : राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यच्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मनपाने आज राजनगर झोपडपट्टीवर बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे ८३ कुटुंबांचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.