व्हॉट्सॲपवरील कमेंट पडली महागात; वरातीत झाडल्या गोळ्या

यशोधरानगरमधील घटना; सहा आरोपींना अटक
bullets fired
bullets fired SAKAL
Updated on

नागपूर : व्हॉट्सअपच्या स्टेटसवर खराब कॉमेंट केल्याने एका तरुणाने चक्क वरातीमध्ये दुचाकीवर येऊन हवेत गोळ्या झाडल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी दुचाकीस्वार युवकांनी तरुणावर चाकू हल्ला करीत जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खाना खजाना हॉटेल समोर रोड परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सातपैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत केली आहे. (Nagpur Crime)

समीर खान वय (वय २२), अल्तमास अन्सारी वर्ल्ड अयुब अन्सारी, अन्वर अन्सारी वर्ल्ड असरार अंसारी (वय २२), मोहम्मद सोहेल अन्सारी वर्ल्ड सईद अंसारी आरिफ अन्सारी आयुब अन्सारी, मोहम्मद कैफ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री फिरोज खान वल्द गफार खान (वय ४५ रा. मेहबूबपुरा ) यांच्या पुतण्याचे लग्न काल होते. वरात काढण्यात आली. ही वरात खजाना हॉटेल समोर रोड परिसरात येताच त्या वरातीच्या मधोमध दुचाकीवर समीर आणि त्याचा मित्र अल्तमस आला. यावेळी समीरने बंदूक काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या.

अचानक झालेल्या प्रकाराने वरातीमधील सर्व नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी समीरने फिरोज खान यांच्या भाचा अशरफ खान अकरम खान (वय १६) याच्यावर चाकुने हल्ला करीत त्याला जखमी केले. त्यानंतर तो मित्रासह पळून जात असताना नातेवाइकांनी त्याला पकडले व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चाकू, बंदूक आणि फायर केलेले दोन काडतूस जप्त केल्या. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवित, त्याच्या चार साथीदारांना अटक केली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com